Vision
समाजाचा सर्वांगीण विकास साधणे.
असे निश्चीत करण्यात आले आहे. ध्येयपुर्तीसाठी आस्थाचे ऊद्देश ठरविण्यात आले आहे , जेणेकरुन एकेका ऊद्देशपुर्तीकरीता नियोजनबध्द कार्य करणे सहज शक्य होईल.
आस्थाचे ऊद्देश –
1.सामाजीक विकास
2.आर्थीक विकास
3.शैक्षणीक विकास
4.राजकीय विकास
आर्थीक व शैक्षणीक विकास हे समाजाचे सर्वांगीण विकासाचा पाया आहे.
त्यामुळे प्राधान्याने आर्थीक विकासाकरीता संस्थात्मक पर्याय म्हणुन आस्था नागरी सह.पतसंस्थेची स्थापना करण्यात आली.
अशा या सहकारी संस्थेच्या यशाकरीता आस्थागृप झटत आहे. समाजाला जगणे व जगवीण्याचे शिक्षण -प्रशिक्षण देण्यासाठी विविध प्रकल्प , ऊपाययोजना व कार्यक्रमाची रीतसर अंमलबजावणी करण्याकरीता Astha Education Society ची स्थापना करण्यात आली आहे.
अंधश्रध्दा , महिला सक्षमीकरण , शिक्षण – प्रशिक्षण, करीअर गायडंस, करीअर कौन्सीलींग, स्पर्धा परीक्षा, व्यसनाधीनता, रोजगार, परस्पर सहकार्य ई.विषयावर सातत्यपुर्ण कार्य करण्याकरीता आस्थागृपची प्रबोधन, शिक्षण, संघटन व सहकार या चतुःसुत्री ने ऊपाययोजना Astha Education Society आपल्या 100 प्रशिक्षीत कार्यकर्त्याचे माध्यमातून कार्यरत आहे.
आस्थागृपचे ध्येय व ऊद्देश नीश्चीत असल्यामुळे तसेच ध्येयपुर्तीसाठी चतुसुत्री वर कार्य करायचे असल्यामुळे नियोजनबध्द चळवळ अल्पावधीतच समाजाचे विश्वास संपादन करण्यात यशस्वी ठरली आहे.
आस्थाला सहकार्य करणारी 1000 समाजबांधव , कार्यकर्ता व नेतृत्व संघटीत करुन वेळ, बुध्दी, पैसा, श्रम व कला यांचे योगदान मिळवत निरंतर कार्य प्रेरणा निर्माण करणे .
आस्थाची कार्यप्रेरणा ही आपले संत व महामानवांनी केलेले समाजसुधारणेचे कार्य पुढे नेणे हीच आहे.
अशा या कार्यात आपला खारीचा वाटा ऊचलणे हे आपले कर्तव्य असावे.
धन्यवाद !
