Contact Us:

+918308503793

who we are

आस्था गृप …………

ऊद्देशात्मक कार्य आणि समाजाचा सर्वांगीण विकास

आस्था गृप हा समाजातील वेल सेटल्ड व सिलेक्टेड अशा कार्यकर्त्यांचा गृप आहे ज्यांना समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता आपलं योगदान द्यायचे आहे.

वेल सेटल्ड याचा अर्थ जे आपल्या बौध्दीक क्षमतेच्या जोरावर ऊच्च पदावर व नोकरी मध्ये आहेत. तसेच आपला ऊद्योग किंवा व्यवसाय सांभाळुन वैयक्तिक समाजसेवेमधुन नाव लौकिक प्राप्त आहेत आणि समाजासाठी योगदान देण्याची भावना ठेवतात..

सिलेक्टेड याचा अर्थ समाजातील असे व्यक्ती /तरुण जे सामाजीक कार्यात सतत पुढे असतात. विविध संघटना ,संस्था वा पक्षाचे माध्यमातून आपल्या समाजाला पुढे आणण्यासाठी आग्रह करतात व प्रयत्न करतात. स्वतः पुढाकार घेऊन आपल्या लोकांचे संघटन असावे असे यांना सतत वाटत असते. योगदान देणे व कार्य पार पाडणे यासाठी हा सिलेक्टेड कार्यकर्ता केव्हाही तयारच असतो.

समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी

  • प्रबोधन
  • शिक्षण
  • संघटन
  • सहकार

या निश्चित व नियोजनबध्द मार्गाने जात सर्वप्रथम आर्थिक व शैक्षणिक विकास साधणे आहे. त्यासाठी आपण आपली बैंक ऊभी झाली आहेत. जेणेकरुन
१) सहकाराचे माध्यमातून सर्व समाज कायमस्वरुपी एकत्र येईल.
2) आपली वैयक्तिक आकस्मिक अडचण भागवता येईल.
३) आपल्या कडून अपेक्षा असणा-या नातेवाईकांची गरज ,अडचण सोडवता येईल .
४) समाजातील अंतिम घटकाला संधी व कर्ज मिळेल जे आजही पोत्यावर किंवा झाडाखाली आरसा लावुन काम करतात.

यासाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.
याशिवाय

शैक्षणिक विकास साधण्यासाठी … Astha Education मार्फत ….

आपली मुलं आधिकारी वा कर्मचारी कसे बनतील याकडे लक्ष देणार आहे.
ती व्यवस्था आज तयार आहे.
समाजाला संघटित करुन प्रबोधन करणे.
तरुणांमध्ये व्यावसायीक , संघटनात्मक व राजकीय कौशल्ये निर्माण करणे,
महिला व मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे.
विविध सरकारी योजनांची माहीती पुरवणे व लाभ मिळवुन देण्यासाठी संघटित प्रयत्न करणे सहकार्य करणे.
आरोग्य विषयक सुविधा करीता माहिती व वेळेवर मदतीची पुर्तता करणे.

अशा प्रकारचे कार्य आस्था ने हाती घेतले आहे.

आस्थाचे कार्य हे २७ कोअर मेंबर व या कोअरनी जोडलेल्या १०० वेल सेटल्ड व सिलेक्टेड कार्यकत्यांचे
माध्यमातून चालते.
चांगल्या कार्यकर्त्याला कोअरमध्ये संधी दिली जाते व यातुनच संस्था व पतसंस्थेचे संचालक निवडले जातात.

आपल्यालाही हि संधी घेतलीच पाहीजे कारण आपणही या समाजाचं काहीतरी देणं लागतो.

धन्यवाद……!

आस्थाची विकास धोरण आणि त्यासंबंधी चतुर्सुत्री

N

शैक्षणिक धोरण

N

आर्थिक धोरण

N

सामाजीक धोरण

N

राजकिय व सांस्कृतिक धोरण