Volunteer
आस्थाचा
मानबिंदू कार्यकर्ता
भविष्यातील आस्थामधील नेतृत्व कार्यपद्धती अन् कार्यकर्ता
आस्थामधील नेतृत्व
“संघटनला पुढे घेऊन जाणारे सर्वामध्ये प्रेरणा आत्मविश्वास अन ध्येयाप्रती एकनिष्ठ असणारे नेतृत्व असावे.” संघटनचा ” नेता ” ही व्यक्तीनिष्ठ संकल्पना आहे तर ” नेतृत्व ” ही व्यापक संकल्पना आहे. नेता बदलु शकतो , नेता मॕनेज होऊ शकतो , नेत्यासमोरचे ध्येय अन ऊद्देश बदलु शकते मात्र नेतृत्वासमोरील ध्येय अन ऊद्देश कायम असतो.
नेतृत्वाने सदैव प्रेरक , मार्गदर्शक , संयमी अन आश्वस्त असले पाहीजे.
आस्थामधील कार्यकर्ता
कार्यकर्ता ही संघटनची खरी ताकद असते.
कार्यकर्त्यांच्या सक्षमतेवर , कार्यकर्त्यांचे कार्यक्षमतेवर , त्यागावर अन योगदानावर त्या संघटनची ताकद अवलंबुन असते.
एक सक्षम अन प्रशिक्षित कार्यकर्ता हाच संघटनचा नेता बनु शकतो ” नेतृत्व ” देऊ शकतो.कार्यकर्त्यांचे खांद्यावर संघटन ऊभे असते , नेत्यांचे नाही.
कार्यकर्त्यांला संघटनचे ध्येय महत्वपुर्ण असले पाहीजे नेता नाही.
वेळप्रसंगी ध्येयापासुन दुर गेलेल्या नेत्याला दुर हटवुन नेतृत्व करण्याची क्षमता ” कार्यकर्ता ” मध्ये असली पाहीजे.
संघटन विरोधी वक्तव्ये , कृती अन मतभेद निर्माण करणारा व्यक्ती कार्यकर्ता असुच शकत नाही अशा व्यक्तीची संघटनमध्ये कोणतीही जागा नसते.
आस्थामधील कार्यध्दती
संघटनची रचना म्हणजे निव्वळ ऊतरंड नसावी ती वारंवार बदलणारी पण नसावी.
निर्णय घेता यावे अन त्याची अंमलबजावणी करता यावी या करीता निश्चित अशी कार्यपद्धती असावी.
रचनेमध्ये ” पद ” ही महत्वपुर्ण संकल्पना आहे.
“पद ही संघटनची आवश्यकता असते समाजाची नाही .
याची सदैव जाणीव नेतृत्वाला व कार्यकर्त्यांला असली पाहीजे.संघटनची कार्यपद्धती ही संघटनमध्ये प्रेरणा व समानतेचा भाव अन आदर जपणारी असावी.
म्हणजे संघटनचे ध्येय गाठणे सोपे व सहज शक्य होईल.
संघटन सिध्दांत -
“जिनका ध्येय और ऊद्देश एक होता है ऊनका एक और एकही संघटन होता है. संघटन अगर आलग है तो निश्चित ही ऊद्देश भी अलगही होगा.
धन्यवाद !
संघटीत रहा- विश्वास ठेवा आपला विकास आपल्याच हाती आहे.
जय सेनाजी !
